विवाह समारंभ आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी टाळण्यावर सरकारचा भर
By MahaTimes ऑनलाइन वृत्तसेवा | मुंबई
अनेक देश ओमायक्रॉन संकटामुळे लॉकडाऊनच्या दिशेनं जात आहेत. तर दुसरीकडे राज्यात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ख्रिसमस, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे. निर्बंधाबाबतची नवी नियमावली दुपारी जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनबाधितांनी उच्चांक गाठला असून आज 23 रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक झाली आहे. या बैठकीत टास्क फोर्समध्ये नव्या निर्बधांवर झाली. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नवे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. तसेच लग्न समारंभ आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी टाळण्यावर देखील सरकारचा भर आहे. तसेच रात्री 144 कलम लागण्याची शक्यता आहे.
राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी व आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत लक्षात घेता कमीतकमी गर्दी कशी होईल त्यासोबाबतच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत. या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली.
तसेच नरेंद्र मोदींनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत राज्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहे.
गर्दीच्या कार्यक्रमांना, ठिकाणांवर निर्बंध आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.