महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आदर्श समाज सेवक पुरस्कार प्रदान
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून युवा सामाजिक कार्यकर्ते शाहेद पटेल यांचा दर्पण दिनी आदर्श समाज सेवक -2022 पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

येथील स मा गर्गे भवन येथे हा दिमाखदार पुरस्कार सोहळा गुरूवारी (दि. 6) रोजी पार पडला. माजी आमदार उषाताई दराडे, पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, वरिष्ठ पत्रकार संतोष मानुरकर, सामाजिक कार्यकर्ता मनिषा तोकले, वरिष्ठ पत्रकार प्रतिभाताई गणोरकर, महेश वाघमारे, पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या हस्ते शाहेद पटेल यांना आकर्षक सन्मानचिह्न, सम्मानपत्र देउन गौरविण्यात आले.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे युवा समाजसेवक शाहेद पटेल यांनी पटेल फाउंडेशन च्या माध्यमातून निरंतर योगदान देत आहे. त्यांनी कोरोना संक्रमण काळात संकटात सापडलेल्या जनतेला सामाजिक भावनेतून मदतीचा हाथ पूढे करून फिरता दवाखाला चालवून आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला एक प्रकारे सहकार्य केले. लॉकडाउन दरम्यान रोजगार बुडाल्याने गरीब, कष्टकरी व सामान्य संकटात हजारो लोकांना राशन कीट वितरित केले. दरम्यान त्यांना जिल्हा प्रशासन व विविध संघटनांनी योगदानाची दखल घेउन गौरविले होते. शाहेद पटेल यांच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई बीड जिल्हा शाखेने दखल घेत त्यांना आज दर्पण दिनी आदर्श समाज सेवक -2022 पुरस्कार प्रदान केला.
याप्रसंगी जिल्हाभरातील मान्यवर संपादक, प्रतिष्ठीत नागरीक, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दर्पण दिनी सामाजिक कार्यकर्ते शाहेद पटेल यांचा आदर्श समाज सेवक -2022 पुरस्कार प्रदान करतांना माजी आमदार उषाताई दराडे, पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, वरिष्ठ पत्रकार संतोष मानुरकर, वैभव स्वामी आदि.