सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंचा दोन वर्षातील कामाचा अहवाल सादर
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारून आज (दि. 06 जानेवारी) दोन वर्ष पूर्ण झाली, या काळात घेतलेल्या विविध लोककल्याणकारी निर्णयांची श्रृंखला आपल्या समोर मागील 40 दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतोच आहे. लोकसेवेचा हा अविरत वसा असाच अखंडित राहील.’ अशा शैलीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारून दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खास ट्विट केले आहे.

या ट्विट मध्ये “जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहां अभि बाकी है। अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीं हमने,सारा आसमाँ अभी बाकी है।” या खास शायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी या दोन वर्षात केलेल्या कार्यापेक्षाही पुढील काळात आणखी खूप काही करणे अभिप्रेत असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.
दरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी दोन वर्षात विभागाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. काही योजनांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कालानुरूप बदल केले, काही नाविन्यपूर्ण योजना, दोन नवीन महामंडळे सुरू केली. काही नवीन योजना अंतिम टप्प्यात आहेत तर बऱ्याच योजना प्रस्तावित केल्या आहेत.
या सर्व निर्णय प्रक्रियेतील ठळक निर्णयांचे प्रगतीपुस्तक कॉफी टेबल बुक स्वरूपात तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासह सर्व पक्षश्रेष्ठींना व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सादर केले आहे. त्याचबरोबर या पुस्तकाची पीडीएफ कॉपी सर्व पत्रकार, तसेच जनतेच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिली आहे.
जिंदगी की असली उडान अभी बाकी है,
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 6, 2022
जिंदगी के कई इम्तिहां अभि बाकी है।
अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीं हमने,
सारा आसमाँ अभी बाकी है।
सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारून आज दोन वर्ष पूर्ण झाली,या काळात घेतलेल्या विविध लोककल्याणकारी निर्णयांची श्रृंखला आपल्या समोर मागील 40 (1/2) pic.twitter.com/8Nqm7uxftc
मागील 40 दिवसांपासून ‘श्रृंखला 50 लोककल्याणकारी निर्णयांची’ या सदराखाली धनंजय मुंडे यांनी दररोज एक निर्णय समाज माध्यमांवर देखील मांडला आहे.
06 जानेवारी, 2020 रोजी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर प्रत्येक महिन्याला आपल्या कार्याचा अहवाल पक्षश्रेष्ठी व जनतेसमोर सादर करण्याची परंपरा धनंजय मुंडे यांनी सुरू केली. ही परंपरा 2 वर्ष सातत्याने अबाधित ठेवणारे एकमेव मंत्री म्हणून धनंजय मुंडे आता सिद्ध झाले आहेत. आपल्या विभागाचा कारभार पारदर्शक असावा तसेच आम्ही तिथे बसून नेमके काय करतो हे त्या विभागांतर्गत लाभ मिळवणाऱ्या सर्व समाज घटकांना माहीत असावे, अशी यामागे ना. मुंडेंची भूमिका आहे.