By MahaTimes ऑनलाइन – बीड |
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत जिल्ह्यात शेकडो रूग्ण आढळून येत आहेत. शनिवारी प्राप्त रिपोर्टनुसार गेल्या 24 तासात 2408 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात 232 पॉजिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 9.63 टक्के संक्रमित रूग्ण आढळले. बीड तालुक्यात सर्वाधिक 49 तर अंबाजोगाई तालुक्यात 39 बाधित आढळले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. असे असतानाही कोरोना बाधित रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बीड जिल्हयात शनिवारी 232 रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
तालुकानिहाय बाधित रूग्ण
| अंबाजोगाई | 39 | 
| आष्टी | 13 | 
| बीड | 49 | 
| धारूर | 06 | 
| गेवराई | 15 | 
| केज | 17 | 
| माजलगाव | 20 | 
| परळी | 21 | 
| पाटोदा | 30 | 
| शिरूर | 09 | 
| वडवणी | 13 | 
| एकुण रूग्ण | 232 | 
 

