मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांच्यासह विविध मान्यवर नेत्यांची राहणार उपस्थिती
वंचित, पिडित घटकांसाठी काम करणार्या व्यक्ती होणार सन्मानित
By MahaTimes ऑनलाइन | बीड
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आज (3 जून) रोजी लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर जनसागर उसळणार आहे. मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदारांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून कार्यक्र माला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मध्यंतरी दोन वर्षे कोरोना महामारीमुळे गडावर कोणतेही जाहीर कार्यक्र म होऊ शकले नव्हते. 3 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वा. ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे तद्नंतर दर वेळेप्रमाणे समाजातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणार्या व्यक्ती तसेच संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
सामाजिक उत्थानाचा वसा
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडला आहे. कोरोना काळात सेवा यज्ञातून दिलेला मदतीचा हात, महा आरोग्य शिबीर, अपंगाना साहित्य वाटप, बेरोजगारांना नोक-या, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणकि मदत, शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराला मदत, सामुदायिक विवाह सोहळा आदी विविध उपक्र म राबवून सामाजिक उत्थानाचा वसा घेतला आहे. येत्या 3 जून रोजी होणा-या कार्यक्र मास सर्व नागरिक तसेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
तगडा पोलीस बंदोबस्त
या कार्यक्रमाला मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदारांसह मान्यवर उपस्थित राहणार असल्याने तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ADVT

ADVT
