सामाजिक शांतता व राष्ट्रीय एकात्मतेसाठी दुआ-प्रार्थना, हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकोप्याचे दर्शन घडविले
By MahaTimes ऑनलाइन | बीड
जिल्ह्याभरात रविवारी ईद-उल-अजहा (बकरीद) चा सण मोठ्या उत्साहात बीडमध्ये बकरी ईद साजरा करण्यात आला. शहरातील ईदगाहसह मोठ्या मस्जिदमध्ये ईद निमित्त विशेष सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी सामाजिक शांतता व राष्ट्रीय एकात्मता यासाठी प्रार्थना करण्यात आली. हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईद व आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत एकोप्याचे दर्शन घडविले.

ईदच्या नमाज नंतर पारंपारिक पद्धतीने कुरबानीची रस्म अदा करण्यात आली. बीड शहरातील इस्लामपुरा जुनी ईदगाह, बालेपीर नवी ईदगाह, बीड तकीया मस्जिद, मरकज मस्जिद, मदरसा दारुल उलूम बीड, मेहराज मस्जिद अजमेर नगर, दर्गाहवाली मस्जिद बालेपीर, केजीएन मस्जिद शहेंशाह नगर, अक्सा मस्जिद शहंशाह नगर, जामा मस्जिद किल्ला मैदान, कुरेशी मस्जिद मोमीनपूरा, जकेरिया मस्जिद, काली मस्जिद इस्लामपुरा, बारादरी मस्जिद इस्लामपुरा, शहेंशाहवली दर्गाह मस्जिद, आलिया मस्जिद झमझम कॉलनी, कादर पाशा मस्जिद, झारा मस्जिद, जामा मस्जिद मोमीनपुरा, अबुजर मस्जिद, अरफात मस्जिद मोमीनपुरा, मक्का मस्जिद मोमीनपुरा, मजाहिरूल उलुम मस्जिद मोमीनपुरा, मासुम कॉलनी मस्जिद, हुजरा मस्जिद, नुरानी मस्जिद मोमीनपुरा, बीड मामला मस्जिद, मोहंमदिया मस्जिद आदिसह शहरातील प्रमुख मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली.
नमाज नंतर हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. बीड येथील इस्लामपुरा ईदगाह येथे ईदची नमाज अदा केल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार राठोड व अन्य पोलिस अधिका-यानी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देउन शुभेच्छा दिल्या.
