By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड शहरात सकल मराठा समाजासाठी वधु-वर थेट-भेट परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा शनिवारी (दि.1 ऑक्टोबर ) रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत स्काऊट गाईड भवन, एस टी स्टॅन्ड समोर बीड येथे होणार असल्याची माहिती राजमाता जिजाऊ वधू-वर विवाह संस्थेचे शिवाजीराव निकम यांनी दिली.

प्रसिद्धी पत्रकात निकम पुढे म्हणाले कि, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सकल मराठा समाजाचे संघटन एकत्रित करण्याचे कार्य सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून होत असून राज्यभरात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात सध्या काम चालू आहे. विवाह इच्छुंचे लग्न जमविणे सकल मराठा समाजातही आता दिवसेंदिवस अत्यंत जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे जिल्हानिहाय व तालुकानिहाय वधु-वर थेटभेट मेळावे होत आहे.

बीड शहरातील मराठा वधु-वर थेट भेट मेळाव्यात सकल मराठा समाजातील विवाहच्छूक वधू-वर व त्यांच्या पालकांनी आपल्या मुला मुलीची नाव नोंदणी करावी असे आवाहन सकल मराठा सोयरीक ग्रुपचे मारूतीराव तिपाले, नामदेवराव शिंदे सर, हरीभाऊ जगताप, सुनीलभाऊ अनभुले, किसनराव वळेकर, अशोकराव गायकवाड, मच्छिंद्रजी कुटे, अच्युतराव विधाते, मनोज जाधव, रवींद्र भुसारी, दत्ता इंगळे, राजाभाऊ गुलभिले, सचिन उबाळे, संतोष आंबाडे, किरण सोलाट, थापडे सर यांनी केले आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील विवाहइच्छूक स्वतःचे फोटो, बायोडाटा सह उपस्थित रहावे, असे आवाहन राजमाता जिजाऊ वधू-वर विवाह संस्थेने केले आहे.
