माजलगाव-तेलगाव हायवेवरील नित्रुड जवळ ही घटना घडली
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत कार आणि दुचाकी – तीन तरुण ठार झाल्याची घटना आज रात्री आठ वाजे दरम्यान घडली. तिघेही तरुण लहामेवाडी येथील असून तेलगाव येथील जिनिंगवर मजुरीचे काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मृत लक्ष्मण सुभाष कापसे (वय) (36वर्ष), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय 30 वर्ष ), अण्णा बळीराम खटके (वय 27 वर्ष) काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी परतत होते. माजलगाव-तेलगाव हायवेवरील नित्रुड पासून तीन किमी अंतरावर एक भरधाव कार सोबत दुचाकीची धडक झाली.
अपघात इतका भीषण होती की, दोघे मजूर जागेवरच ठार झाले. दरम्यान एक जणांना उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. दरम्यान, चालक कारसह दिंद्रुड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
