शिक्षक ठार ; पत्नी जखमी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कड्याकडे जात असताना कार दोनशे फुट खोल दरीत कोसळुन झालेल्या अपघातात शिक्षक अंबादास पांडुरंग उगले (45) हे जागीच मुत्यु झाला तर पत्नी पत्नी सगुणा उगले (40) ह्या जखमी झाल्या. हा अपघात बीडसांगवी येथील महादेव दरा येथील घाटात सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास घडला.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील थेटे सांगवी येथील अंबादास पांडुरंग उगले हे गेवराई येथील एका शाळेवर शिक्षक म्हणुन कार्यरत असुन ते गेवराई येथे राहतात. तर त्यांच्या मुलांचे शिक्षण लातुर येथे सुरू असल्याने त्यांची पत्नी मुलांसोबत राहते. सोमवारी सकाळी ते कडा येथील एका नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी उगले हे कार (क्र मांक एम.एच 23 ए.डी.0249) गेवराईहून कड्याकडे जाते होते.
दरम्यान त्यांची पत्नी सगुणा ह्या अन्य वाहनाने लातुरहुन सावरगांव घाट पर्यंत आल्या होत्या. सावरगांव घाट येथुन शिक्षक उगले हे पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी कड्याकडे स्वत:च्या चारचाकी गाडीत येत असताना बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात अज्ञात वाहनाने कट मारल्याने ताबा सुटुन कार दोनशे फुट खोल दरीत कोसळुन हा भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती समजताच जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे, बीडसांगवीचे सरपंच नंदकिशोर करांडे, संपत ढोबळे, विकास साळवे, दीपक कासवा, गणेश करांडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव धनवडे, पोलिस बी.ए. वाणी आदींनी अपघात ग्रस्तांना मदत केली. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच जखमीला पुढील उपचारांसाठी हलविण्यासाठी मदत केली.
