दमनकारी भाजप सरकार चा निषेध
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अरविंद केजरीवाल जींनी विचारलेल्या कठीण प्रश्नांमुळे अडचणीत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) आज रविवार दिनांक १६ एप्रिल, २०२३ रोजी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे वेळ प्रसंगी अरविंद केजरीवालांना तुरुंगात टाकून भाजप कडून दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार बरखास्त केले जाऊ शकते. या दमनकारी भाजप सरकार चा निषेध करण्यासाठी आज रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी आम आदमी पार्टी महाराष्ट्रातर्फे संविधानिक मार्गाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आले.

राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, शहर व गाव पातळीवर होणाऱ्या या सत्याग्रहात राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होऊन “आपण सत्या सोबत आहोत, आणि अघोषित आणीबाणी चा निषेध करतो” हे दाखवायची वेळ आहे. हे दाखवण्यासाठी आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिका सत्याग्रहात सहभागी होते यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी डॉ. गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष भीमराव कुटे तालुकाध्यक्ष सय्यद सादेक शहराध्यक्ष मिलिंद पाळणे शहर सचिव मा.माऊली नाना शिंदे दत्ता सुरवसे सर्कल संघटन मंत्री इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
मोफत वीज, पाणी देण्याचे कार्य करणारे एकमेव केजरवाल सरकार
दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य, मोफत वीज, पाणी व महिलांना प्रवास देण्याचे कार्य करणारे एकमेव सरकार म्हणजे अरविंद केजरवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचे सरकार! तर दुसरीकडे अडाणी सारख्या भ्रष्ट उद्योगपतींची पाठराखण करणारे केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. आज देश-विदेशात आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकार ची स्तुती होत आहे. दिल्ली सरकारच्या चांगल्या कामाची तुलना भाजप शासित राज्यांच्या सरकारशी होत आहे.
