▪️ कमी दिवसांत मायक्रो नियोजन करत सर्व प्रभागात जोरदार प्रचार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत डॉ. योगेश क्षीरसागर यांना अजित पवार यांच्या पक्षातून अचानक बाहेर पडावे लागले. त्यानंतर क्षणार्धात त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संभाजीनगर येथे त्यांचे औपचारिक स्वागत झाले. प्रवेश होताच त्यांनी तुफानी वेगात काम सुरू करत अत्यंत कमी दिवसांत बीड शहरात ‘कमळ’ फुलविण्यात यश मिळवले.

नगरपालिकेच्या ५२ उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी डोअर-टू-डोअर धडक मोहिम राबवत प्रचारात आघाडी घेतली आहे. या मोहिमेत त्यांची पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांचीही भक्कम साथ असून महिलांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील सर्वच प्रभागात भेटी देत, स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांशी थेट संवाद साधत, “राहिलेला विकासाचा अनुशेष आम्ही भरून काढणार” असा संदेश देत ते मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करत आहेत. अनेक प्रभागांत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
