By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. सकाळच्या कडक थंडीच्या वातावरणामुळे मतदानाची गती काहीशी मंदावली होती; मात्र दुपारनंतर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार सर्व नगरपालिकांचा मिळून सरासरी 69.36 टक्के मतदान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेवराई आणि बीड मधील घटनेचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सर्व मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदार निर्धास्तपणे मतदानासाठी पुढे आले. अनेक केंद्रांवर शेवटच्या तासापर्यंत लांबच लांब रांगा दिसून आल्या. काही केंद्रांची अंतिम आकडेवारी उशिरापर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या सहा नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी मतदान झाले असून, आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या मतमोजणीकडे लागले आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केले जाणार आहेत.

नगरपालिका / एकूण मतदार / झालेले मतदान/ टक्केवारी
परली : 79569/51332 / 64.51%
अंबाजोगाई : 65641/ 46178 / 70.35%
गेवराई : 30161/22134/ 73.39%
किल्ले धारूर : 18909 /13687 / 72.38%
बीड़ : 180658/1,06,558 / 58.98%
माजलगांव : 40881 /31241 /76.42%
