MahaTimes
बीड : गेल्या २५ वर्षांपासून हिंदी, उर्दू व मराठी पत्रकारितेत प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्यरत असलेले बीडचे प्रसिद्ध पत्रकार रईस खान सिकंदर खान यांची ‘खादिमीन-ए-उम्मत’ संस्थेच्या राज्यस्तरीय ‘आफताब-ए-सहाफत’ (पत्रकारितेचा सूर्य) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र खादिमीन-ए-उम्मतचे बीड जिल्हा निमंत्रक सय्यद मुमताज अली हाशमी, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नदीम मिर्झा तसेच ज्येष्ठ साहित्यिक अरशद सिद्दीकी यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले. या पुरस्काराचे वितरण रविवार,18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता हैदर गार्डन फंक्शन हॉल माल टेकडी रोड, देग्लूर नाका नांदेड़ येथे एका समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
रईस खान सिकंदर खान यांनी यापूर्वी ‘दैनिक औरंगाबाद टाईम्स’ (उर्दू), ‘दैनिक एहतेमाद’ (उर्दू), दैनिक तामीर ( उर्दू), ‘दैनिक इन्साफ-ए-आलम’ (हिंदी), ‘दैनिक अलहिलाल’ (उर्दू) तसेच ‘औरंगाबाद सिटीजन्स’ (हिंदी) चे जिल्हा प्रतिनिधी असून ऑनलाइन मराठी न्यूज वेबसाईट ‘महा टाइम्स.इन’ आणि ‘बीड इन्साफ’चे मुख्य संपादक (चीफ एडिटर) म्हणून कार्यरत असून तसेच म. रा. मराठी पत्रकार संघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आहेत.
रईसखान यांनी गेल्या २५ वर्षांत त्यांनी आपल्या लेखणीद्वारे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच नागरी प्रश्नांवर जनतेचा बुलंद आवाज मांडला. त्यांच्या दीर्घकालीन व उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
