सत्तेचा उपयोग आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी केला – डॉ.योगेश क्षीरसागर
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष व आमदार संदीप क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक समीर तांबोळी यांनी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला.

युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर बोलताना म्हणाले की, अडीच वर्ष बेपत्ता होऊन आता बीड नगरपालिका ताब्यात द्या, विकास करून दाखवतो अशा वल्गना करणार्या बीडच्या आमदारांनी सत्ता मागत असताना आपण जनतेसाठी काय केले हे दाखवून द्यायला हवे. आम्ही नव्हे आमचा विकास बोलतो, विकासाच्या माध्यमातूनच आम्ही जनतेच्या जवळ राहिलेलो आहोत. म्हणूनच तर जनतेने पंचवीस वर्ष सत्ता दिली मात्र या सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहरासह स्थानिक भागातील विकासाचे प्रश्न सोडविले असून समीर तांबोळी सारखे सहकारी अगोदर विरोधकांसोबत होते मात्र आमदार होऊन देखील मागील अडीच वर्षात कसलेही विकास कामे न झाल्यामुळे आणि लहान लहान प्रश्न न सोडवू शकल्यामुळे आज हे सहकारी आज आमच्या सोबत येत आहेत. भविष्यात आपण ज्या विकासाच्या मुद्द्यावर सोबत आलात त्या नक्कीच सोडविल्या जातील व आगामी काळातही विकासाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाहीत अशी ग्वाही युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी याप्रसंगी दिली.

विकास कामे करणे हे आमचे कर्तव्य -नगराध्यक्ष क्षीरसागर
नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, आज समीर तांबोळी यांच्या प्रवेशासाठी ज्या मोठ्या संख्येने महिला भगिनी, नागरिक, युवा कार्यकर्ते आले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोठ मोठे विकास कामे झाल्यामुळे या प्रभागातून आम्हाला सर्वात जास्त मतं मिळतात. विकास कामे झाल्याने स्थानिक नागरिकांसाठी उद्योगधंद्याची, व्यवसायांची मोठी संधी उपलब्ध झाली. विविध योजना अंमलबजावणी या प्रभागात राबविण्यात आल्या. रमाई घरकुल योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मध्ये 200 घरकुल दिले व गोर गरीब लोकांना हक्काचे घर मिळाले. या प्रभागात आर्थिक दृष्ट्या समानता झाली पाहिजे या दृष्टीने कामे केली. स्थानिक नागरिकांनी मतदानाचा रूपातून दिलेले आशीर्वादाची परतफेड विकासाच्या कामातून करायची आहेत. विकास कामे करणे हे आमचे कर्तव्य असून या कर्तव्याची जाणीव ठेवून सातत्याने विकासाची कामे केले आहेत त्यामुळे आमची आभार मानण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. बीड शहरातील नागरिकांनी जात-पात-धर्म पक्ष न बघता विकासाच्या कामाकडे लक्ष देऊन कायम सहकार्य केल्यामुळेच मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून नगराध्यक्ष असल्याचे सांगितले.
याप्रसंगी समीर भैया तांबोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना लोकप्रतिनिधी यांच्याकडे कार्यकर्ता म्हणून एक निष्ठेने पक्षाचे काम करून देखील न्याय मिळाला नसल्याचे सांगितले. समीर तांबोळी बोलताना भावनिक झाल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. परिसरातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी नगरसेवक विष्णू वाघमारे, जलिल खान पठाण, किशोर पिंगळे, अॅड.विकास जोगदंड, मुखीद लाला, इकबाल भाई, शुभम धुत, ईलियास भाई, आरेफ खान, मुन्ना ईनामदार, गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, भैय्यासाहेब मोरे, रणजित बन्सोडे यांच्यासह कैलास लगड, नितीन साखरे, अमर विद्यागर, शुभम कातांगळे, सनी वाघमारे, इम्तियाज मनियार, असरार शेख, बाबा खान, मनोज मस्के, अॅड.नागेश तांबारे, प्रमोद शिंदे, नवनाथ शिंदे, सफवान खान, धनंजय काळे, अमोल वाघमारे, अविनाश शिंगनाथ, किरण बेदरे, विठ्ठल गुजर, सुनिल गायकवाड, दिपक चौगुले, गोरख काळे, शुभम प्रधान यांच्यासह असंख्य कार्यकर्ते महिला आणि नागरिक उपस्थित होते.
