By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. मात्र बुधवार चा दिवस दिलासादायक ठरला. 110 नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये तेराशेच्या जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाच्या आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 1802 रु ग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यात 110 रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याची पुष्टी झाली आहे. तर 1692 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासुन बाधितांची संख्या निम्म्यावर आल्याने नागरीकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
| अंबाजोगाई | 25 |
| आष्टी | 11 |
| बीड | 25 |
| धारूर | 04 |
| गेवराई | 09 |
| केज | 04 |
| माजलगाव | 05 |
| परळी | 17 |
| पाटोदा | 01 |
| शिरूर | 08 |
| वडवणी | 01 |
| एकुण रूग्ण | 110 |
