शिक्षणाधिकारी कुलकर्णी, शिंदे यांचे प्रतिपादन
By MahaTimes ऑनलाइन | बीड
रमजान ईद हा सण शांती, प्रेम, सदभावना,भाईचारा जोपासणारा सण आहे. तसेच त्याग, गरीबांना मदद देने, वर्षातील कमाईतून आडीच टक्के दानधर्म करून मानवजातीला एकसंघ ठेवतो. असे प्रतिपादन मा.श्रीकांत कुलकर्णी शिक्षणाधिकारी प्रा.जि.प.बीड, माध्यमिक मा.नागनाथ शिंदे यांनी ईद मिलाप कार्यक्रमात शिक्षकांना शुभेच्छां संदेश देतांना म्हटले.

रमजान ईद निमित्त शेख मुसा शिक्षक नेते तथा मुख्याध्यापक जि.प.केंद्र आदर्श शाळा अशोकनगर यांच्या ईद मिलाप कार्यक्रमात उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेसह भाईचाऱ्याचा संदेश दिला.

यावेळी उप शिक्षण अधिकारी अजय बहीर, भगवान सोनवणे,नाना हजारे,काकडे गटशिक्षण अधिकारी मा.श्रीराम टेकाळे शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम जाधव, सिद्धेश्वर माटे, खटावकर अल्पसंख्यक विभाग प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालय बीड मुन्डे साहेब, शिक्षक नेते राजेंद्र खेडकर, डोईफोडे, उदार, मुळे, फुंदे मुख्याध्यापक शेख रशीद, हकीम मनीयार, काजी मुशाहेद, शेख शोएब, शेख फैसल आदी उपस्थित होते. शेवटी सर्वांनी शिर्खुरमा, गोड जेवनाचा आस्वाद घेऊन समाजात चांगले मुल्य निर्माण करण्याचा संकल्प केला.

