वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी; 10 हजार शस्त्रक्रियांचा टप्पा यशस्वी पार करून रुग्णांना जीवदान दिले
By MahaTimes ऑनलाइन | बीड
राज्य शासनाच्या वतीने बीड येथील प्रसिद्ध डॉ योगेश क्षीरसागर यांना आणि सौ.केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटलला (के.एस.के ) प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य फुले योजना अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग दुसर्या वर्षीही डॉक्टर डे निमित्त गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी 10 हजार यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवदान दिले आहे

वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना लोकनेत्या स्व. काकूंच्या विचारांचा वसा व वारसा जोपासत डॉ योगेश क्षीरसागर यांनी गोरगरीब, दीन दुबळ्या लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे काही दिवसांपूर्वीच 10000 हजार शस्त्रक्रियांचा टप्पा त्यांनी यशस्वी पार केला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य फुले योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात मोफत शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

आज डॉक्टर डे निमित्त जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ योगेश क्षीरसागर सामाजिक राजकीय कार्यात देखील पुढे असून आगामी काळात बीड शहराचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, डॉ.अरुण बडे, डॉ. नितिन चाटे, जिल्हा आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.
