‘सर्व रोग मोफत तपासणी पंधरवडा’ शिबिरास मोठा प्रतिसाद
बीड : शहरातच बीडकरांना अत्याधुनिक, दर्जेदार व सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देत अल्पावधितच लोकप्रिय झालेल्या बीड शहरातील मॅक्सक्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन मंगळवारी (दि. 11) रोजी मोठ्या थाटात संपन्न होत आहे.

मॅक्सक्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. फेरोज शेख यांनी सांगितले की, जास्तीत जास्त रूग्णांना लाभ आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा यासाठी प्रथम वर्धापन दिनाच्या अनुषंगाने 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ‘सर्व रोग मोफत तपासणी पंधरवडा’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात पहिल्याच दिवसांपासुन मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान 10 ऑक्टोबर पर्यंत शेकडो गरजू रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. पुढील पाच दिवसात जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही डॉ. फेरोज शेख यांनी केले आहे.
या शिबिर कालावधीत रु ग्णांची मोफत तपासणी तसेच अतिशय अल्प दरात सोनोग्राफी, रक्त व लघवीच्या तपासण्या, एक्स-रे, हृदयाची सोनोग्राफी (2डी इको) या तपासण्या करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी मॅक्सक्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इफ्तेखार नगर, तेलगाव रोड, बीड येथे ( संपर्क क्रमांक 7276787119, 7020577627, 9623295988 ) रूग्णांनी आपल्या नावाची नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
