डॉ.पराग संचेती यांनी कृत्रिम सांधेरोपण विविध उपचार पर्याय पद्धती बद्दल दिली माहिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि संचेती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे अस्थिरोग तज्ञ सेमिनार आयोजित करण्यात आले होते.जिल्हाभरातून सर्व अस्थिरोग तज्ञ तसेच विविध मान्यवर डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. पुणे येथील संचेती हॉस्पिटल चे संचालक डॉ .पराग संचेती व डॉ.प्रमोद भिलारे यांनी यावेळी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले.

बीड अस्थिरोग संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ.प्रवीण देशमुख, सचिव सुरेश मुंडे आय एम ए चे अध्यक्ष डॉ.अविनाश देशपांडे, सचिव डॉ.राजेंद्र भोरे, डॉ.प्रमोद शिंदे, डॉ.प्रशांत सानप , डॉ.टी एल देशमुख, डॉ.मधुसूदन काळे, डॉ.गीते, डॉ.अंशुमन बहीर, डॉ. अळने, डॉ.अभिनव जाधव, तसेच जिल्ह्यातील सर्व अस्थिरोग तज्ञ आणि डॉ. सी ए गायकवाड, डॉ.के बी पैठणकर, डॉ. माजीद, डॉ.पिंगळकर, डॉ.समीर शेख, डॉ.अरुण बडे, डॉ.पी के कुलकर्णी, डॉ.डी. येस कुलकर्णी, डॉ.संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.पराग संचेती यांनी यावेळी टोटल नी रिपल्समेन्ट, कृत्रिम सांधेरोपण, गुडघाआजाराचे विविध उपचार पर्याय पद्धती बद्दल माहिती दिली. डॉ प्रमोद भिलारे यांनी ओ आर्म तसेच मणक्याच्या रोबोटिक शस्त्रक्रिया बद्दल मार्गदर्शन केले. डॉ.प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर डॉ.राजेंद्र भोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ.पराग संचेती यांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही बीड अस्थिरोग संघटने सोबत असेच उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.

