केवळ 30 रुपयांत मिळणार उपचाराची सोय
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जमियत उलेमा-ए-हिंदच्या सहकार्याने शाहुनगर येथील अंजुमन हिदायतुल इस्लाम रुग्णालयाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या रुग्णालयात फक्त तीस रुपये फिस आकारून उपचार केले जाणार आहेत.

बीड जिल्ह्यातील नागरिक गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत पटेल फाउंडेशन चे अध्यक्ष शाहेद पटेल यांनी गोरगरीब, कामगार आणि सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन कोरोना संकटकाळात फिरते रुग्णालय सुरू केले होते. हा उपक्रम पुढे नेत त्यांनी जमियत उलेमा-ए-हिंद आणि स्थानिक लोकांच्या मदतीने शाहूनगरमध्ये अंजुमन हिदायतुल इस्लाम रुग्णालयाची स्थापना केली. रविवारी या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जमीयत उलेमा-ए-हिंद चे मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती मौलाना शफीक, उपाध्यक्ष हाफेज मौलाना जाकेर सिद्दीकी, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, ज्येष्ठ समाजसेवक मोईन मास्टर, गौतम खटोड, गटनेता फारूक पटेल, शुभम धूत, मौलाना अब्दुल बाखी, अड. शेख शफीक, प्रा. इलियास इनामदार, इरफान बागवान, मुखीद लाला, अंजुमन हिदायतुल इस्लाम रुग्णालय समतिीचे शाहेद पटेल, हाफिज सलाहुद्दीन, हाफिज शमशुद्दीन, काजी शफीक, रईस भाई, बब्बु भाई, कलीम भाई, अर्शद खान, रफीक भाई, एहतेशाम बागवान आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुफ्ती मौलाना शफीक म्हणाले की, जमियत उलेमाने गरीब आणि सामान्य लोकांच्या समस्या लक्षात घेऊन अशी रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या माध्यमातून नि:स्वार्थीपणे केवळ सेवाधर्मार्थ हेतूने आरोग्य सेवा पुरविल्या जात आहेत. सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बीड शहरातील पहिला रुग्णालय गांधीनगरमध्ये सुरू झाले, आता शाहूनगरनंतर बालेपीर परिसरात या आठवड्यात असे रुग्णालय सुरू होणार असल्याचे हाफेज जाकर सिद्दीकी यांनी सांगितले. शाहेद पटेल म्हणाले की, कोरोनाच्या काळात एक मोठा वर्ग आर्थिक संकटातून जात आहे. अशा वेळी त्यांना आणखी आर्थिक भार सहन करावा लागू नये, या हेतूने खिदमत-ए-खल्क या भावनेतून हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. सर्व स्तरातील लोकांनी या रुग्णालयाचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहूनगर, जमियत उलेमा शाहूनगर झोनचे रहवाशी, पटेल फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
छायाचित्र: अंजुमन हिदायतुल इस्लाम रुग्णालय उद्घाटन प्रसंगी जमीयत उलेमा-ए-हिंद चे मुफ्ती मौलाना शफीक, मौलाना जाकेर सिद्दीकी, माजी आमदार सय्यद सलीम, सुनील धांडे, मोईन मास्टर, गौतम खटोड, फारुख पटेल, प्रा. इलियास इनामदार, शुभम धूत, शाहेद पटेल, हाफिज सलाहुद्दीन इत्यादि.