बँकेकडे सर्व मिळून १२२.४२ कोटी रू. एवढे डिपॉझीट; ठेवीदारांना घाबरण्याचे काही कारण नाही
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे ( Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank ) सन २०२२-२३ या वर्षाचा हिशोब पूर्ण झालेला असुन बँक लवकरच आर्थिकदृष्ट्या पूर्व पदावर येत आहे. बँकेकडे सर्व मिळून १२२ कोटी ४२ लाख रूपये एवढे डिपॉझीट आहे तर बँकेकडे रोख शिल्लक १११ कोटी ५८ लाख रूपये एवढे वेगवेगळ्या बँकेत शिल्लक आहेत. बँकेचे कर्ज येणे रुपये १०९ कोटी ३८ लाख इतके आहे. रिझर्व बँकेच्या तांत्रीक बाबीमुळे बँक अडचणीत दिसते परंतु बँक लवकरच आर्थिकदृष्ट्या पूर्वपदावर येईल असा विश्वास बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सारडा यांनी व्यक्त केला.

पुढे बोलतांना द्वारकादास मंत्री बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सारडा म्हणाले की, दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी बँकेवर प्रशासक नियुक्त झाले होते. त्यावेळी बँकेकडे जवळपास २८९ कोटी रुपये डिपॉझीट होते.. परंतु प्रशासक आल्याचा संदेश गेल्यानंतर १२३ कोटी रुपये डिपॉझीट ठेवीदारांनी काढले पुढे ९ मार्च २०२२ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडीयाने आर्थिक निर्बंध आणुन पाच हजार रुपया पर्यंतच्या ठेवी ठेवीदारांना द्यावेत असे आदेश काढले होते. त्यामुळे विम्याचे पैसे मिळण्यासाठी बँकेने जाहिरात देवून अर्ज मागवले होते.
बँकेने दाखल केलेल्या विम्याच्या अर्जापोटी पहिला ४४ कोटी रुपयाचा हप्ता ग्राहकांना मिळाला व जवळपास ३५ कोटी रुपयाचा दुसरा हप्ता डीआयसीजीएस कडुन येणे बाकी आहे. त्याबद्दलही वारंवार भारतीय रिझर्व बँक व डीआयसीजीएस कडे पाठपुरावा करून तो लवकरात लवकर मिळावा किंवा बँकेकडे असलेल्या शिल्लक रक्कमेपैकी ती रक्कम देण्यास मान्यता मिळावी यासाठी भारतीय रिझर्व बँकेकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे.
बँकेकडे आज रु. १११ कोटी चे वर रोख स्वरुपात रक्कम शिल्लक आहेत व ठेवी फक्त १२२ कोटीच्या आहेत. याचा विचार केल्यास बँकेच्या ठेवीदारांना घाबरण्याचे काही कारण नाही असे बँकेच्या ताळेबंदावरुन दिसुन येते. तसेच बँकेने दिलेले कर्ज हे १०९ कोटी ४६ लाख रुपये एवढे येणे बाकी असून बँकेचे शेडर्स भांडवल २० कोटी २८ लाख रुपये आहेत. बँकेचा रिझर्व फंड १५ कोटी २८ लाख इतका असून बँकेने गव्हरमेंट सिक्युरिटीज मध्ये रु. ८० कोटी ४२ लाख ची गुंतवणूक केलेली आहे. बँकेचा सीआरएआर (CRAR) हा १३% च्या पुढे असून बँकेचा नेटवर्थ हा ५ कोटी ६० लाख रुपयाच्या वर आहे. यावरून बँकेची जी काही तांत्रिक अडचण निर्माण झाली.

