जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा- डॉ. शेख तौसिफ
बीड : पल्स हॉस्पिटल, पात्रुड (माजलगाव) येथे 4 आणि 5 मे रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर पुर्णत: मोफत असुन या शिबिराचा परिसरातील रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. शेख तौसिफ यांनी केले आहे.

सदरचे महाआरोग्य शिबिर पल्स हॉस्पिटल, एसटी स्टँड जवळ, मेन रोड, पात्रुड येथे गुरूवार व शुक्रवार रोजी सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन गुरूवारी (दि. 4) रोजी सामाजिक कार्यकर्ते अॅड. कझिम मनसबदार व युसुफ शेख यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी एकनाथ मस्के, घनशाम भुतडा, डॉ. वसीम मनसबदार, मुख्तार मोमीन, उत्तरेश्वर पवार, नजीर कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या दो दिवसीय मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पल्स हॉस्पिटल चे संचालक डॉ. तौसीफ शेख (एमबीबीएस), डॉ. संभाजी नावडकर, डॉ. अश्विनी नावडकर यांनी केले आहे.
👉🏻 हे तज्ञ डॉक्टर देणार सेवा
गुरूवार, शुक्रवार रोजी आयोजित या शिबिरात माजलगाव व बीड येथील प्रसिध्द तज्ञ डॉक्टर रूग्णांची तपासणी करणार आहेत. यात संजीवनी हॉस्पिटल, माजलगाव चे डॉ. ज्ञानेश्वर गिलबीले (सकाळी 9 ते दुपारी. 2 ), समर्थ बाल रुग्णालय,माजलगाव चे डॉ. गणेश पाटील (स.9 ते सायं. 5), अलकाश्री हॉस्पिटल, माजलगाव चे डॉ. विजय खळगे (सायं 5 ते सायं 7), डक हॉस्पिटल, माजलगाव चे डॉ. सचिन डक व डॉ. मयुरी डक (5 मे रोजी स. 9 ते दु. 2), संजीवनी मल्टीस्पेशालिटी, बीड चे डॉ. संकेत बाहेती (स. 9 ते दु.2) तसेच पल्स हॉस्पिटल चे डॉ. शेख तौसिफ व डॉ. संभाजी नावडकर, डॉ. अश्विनी नावडकर (स.9 ते रात्री 9 ) दरम्यान रूग्णांची तपासणी करणार आहेत.
