शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून उत्कृष्ट नियोजन
पुढच्या वर्षी 501 जोडप्यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्याची घोषणा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथे गेल्या वर्षीपासून शिवतीर्थावर सुरू करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या महोत्सवासाठी अठरापगड जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून त्यांच्या हस्ते पूजन केलं जातं पहिल्या वर्षी 151 जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर यावर्षी 201 जोडप्यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन करून राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा शिवतीर्थावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून विशेष परिश्रम घेण्यात आले होते तसेच समितीकडून पुढच्या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा 501 जोडप्यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करून करण्यात येईल अशी देखील घोषणा करण्यात आली. शेवटी सगळ्यांची तोंड गोड करून कार्यक्रमाचा समारोप झाला.

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 101 रक्तदान घेण्यात आला. हजार लोकांचा नाश्त्याची सोय करण्यात आली होती याप्रसंगी खूप उत्साह सर्व शिवप्रेमी मध्ये पाहायला मिळाला. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले होते तसेच सर्व नियोजन उत्कृष्ट पद्धतीने ते होते पूजनासाठी येणाऱ्या अठरापगड जातीतील जोडप्यांसाठी विशेष मस्त करण्यात आली होती तर प्रसादाचे देखील नियोजन करण्यात आले होते. तसेच पुढील वर्षी 501 जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करण्याची घोषणा देखील करण्यात आली..
सोहळ्यातील विशेष…
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पुरूषोक्त ( मंत्रोपचार) बीड शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा परिवारातील मुली यांनी केले आहे. कुमारी स्नेहल कागदे, इशिका किशोर पिंगळे, साक्षी सोळुंके, तन्वी काळे, वैष्णवी कसपटे, गौरी शिरसागर यांच्याकडून मंत्रोपचार करण्यात आले हे लाक्षणिक ठरले आहे.
101 रक्तदात्यांनी केले रक्तदान!
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवतीर्थावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षी 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आपले कर्तव्य बजावले आहे त्याबद्दल शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे.

