By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील जिला परिषद केंद्र अशोकनगर येथे 1 जानेवारी रोजी शिक्षकांची शैक्षणिक शिक्षण परिषद मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली. यावेळी शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवण्याचा निर्धार केला.

या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख फेरोज पठाण तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव, बीट शिक्षण विस्तार अधिकारी सिद्धेश्वर माटे, अभिमान बहीर, शिक्षक नेते उत्तम पवार, केंद्रीय मुख्याध्यापक शेख मुसा आदि उपस्थित होते.
शिक्षण परिषदेत विठ्ठल जायभाय यांनी गणित, आशा भारती यांनी भाषा, कोरडे मॅडम यांनी बालविवाह, प्रशिक्षणाबाबत पठाण अफरीन मॅडम यांनी माहीती दिली. गोष्टीचे वाचन अमृता कुलकर्णी यांनी केले. केंद्र प्रमुख फेरोज पठाण यांनी शैक्षणिक नियोजन तर शेख मुसा यांनी जनरल विषयावर मत व्यक्त केले. या परिषदस गशिअ तुकाराम जाधव, शिविअ सिद्धेश्वर माटे, शिक्षक नेते उत्तम पवार यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
दरम्यान उत्कृष्ट मार्गदर्शन, विषयाची सखोल अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मनावर ठसा कसा उमटेल, शिक्षणात गोडी निर्माण करून विद्यार्थ्यांना गुणवंत करण्याचा निर्धार शिक्षकांनी बैठकीत केल्याबद्दल जायभाय, भारती, कोरडे यांचा गशिअ श्री जाधव यांनी सत्कार केला. तर मान्यवरांचे अशोकनगर केंद्रातर्फे धर्मराज मागदे, पांडुरंग उनवणे, रत्नाकर पवार, सखाराम शिंदे, मनीषा मोराळे,शोभा कदम यांनी सत्कार केला. शिक्षण परिषदेस सर्व शिक्षक उपस्थित होते.
