By MahaTimes ऑनलाइन – बीड |
शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणार्या कर्नाटक येथील प्रसिध्द शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युुट चे संस्थापक डॉ. अब्दुल कदीर हे रविवार, 2 जानेवारी रोजी बीड येथे विद्यार्थी पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.

शाहीन गुप ऑफ अॅकॅडमीची स्थापना 32 वर्षापूर्वी डॉ. अब्दुल कदीर यांनी कर्नाटकच्या बीदर येथे केली होती. सध्या या ग्रुपचे दहा राज्यात पन्नासहून अधिक प्रशिक्षण केंद्र असून या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या 42 हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी परिक्षेत यश मिळवून मोठ्या पदावर कार्यरत आहेत. याअॅकॅडमीची आजपर्यंतची वाटचाल तसेच भविष्यातील संकल्पनाबाबत डॉ.अब्दुल कदीर हे बीड जिला दौर्यावर येत असून 2 जानेवारी रोजी विद्यार्थी पालकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्र माचा लाभ घ्यावा असे आवाहन शाहीन अॅकॅडमी बीडच्यावतीने करण्यात आले आहे.
Tags: Shaheen Group of Academy, | Karnataka, | Beed, | Dr. Abdul Qadir, | Shaheen Group, | MahaTimes, | Maharashtra,
