मदरसा दारुल उलूम बीडने मानले मिडीयाचे आभार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मदरसा दारु ल उलूम बीडचा जलसा-ए-आम नुकताच यशस्वी पार पडला. येथील प्रसिध्दी माध्यमांनी जलश्याचे आयोजन व जलसा कार्यक्रमांच्या बातम्यांना ठळक प्रसिध्दी देऊन जलसा यशस्वी करण्यासाठी जी मोलाची भूमिका निभावली त्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहे असे गौरवोद्गार मदशाचे मुख्याध्यापक मुफ्ती जावेद हुसैनी यांनी काढले.

मदरसा दारु ल उलूम बीडच्यावतीने प्रसिध्दी माध्यमांचे आभार व्यक्त करण्यासाठी बुधवारी शासकीय विश्रामगृह येथे मिडीया आभार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुफ्ती जावेद हुसैनी, मौलाना अमीन साहब, इतर मौलाना, मौलवी यांची उपस्थिती होती.
यावेळी मुफ्ती जावेद हुसैनी म्हणाले की, मदरसा दारूल उलूम बीड चा 60 जलसा-ए-आम 24 फेब्रुवारी रोजी मौलाना अब्दुल जब्बार मजाहिरी नक्शबंदी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. प्रमुख वक्ते म्हणून मौलाना कारी रशीद अहमद अजमेरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जलसा यशस्वीरित्या पार पाडावायासाठी आयोजन कमिटी सह मदशाचे विश्वस्त, शिक्षक व विद्यार्थांनी ही आहोरात्र मेहनत घेतली. जलसा यशस्वी करण्यासाठी समाजातील इतर लोकांचे ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मोलाचे सहकार्य लाभले. यात मोलाची साथ येथील प्रसिध्दी माध्यमांची राहिली.
सर्व पत्रकार बांधवांनी आमच्या विनंतीला मान देत जलसा कार्यक्रमात ठळक प्रसिध्दी दिली यामुळे जलसा कार्यक्रम लाखो लोकांपर्यंत पोहोचला. मदरसा दारूल उलूम बीडच्यावतीने आभार व्यक्त करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमास प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीया चे संपादक, चीफ ब्यूरो, प्रतिनिधी उपस्थित होते.

