By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्हा रूग्णालय बीड येथे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा आयुष समितीची बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत आयुष अंतर रूग्णालयामध्ये आयुर्वेद, योगा, निसर्गोपचार, युनानी व सिद्ध या उपचार पध्दतीवर विविध अंगाने चर्चा करण्यात आली. जुने आजार व दिर्घकालीन आजारावर संबंधीत तज्ञ डॉक्टरांकडून गुणात्मक उपचार गरीब व गरजू रूग्णांना देण्या बाबत तसेच त्यासाठी 20 खाटांचा एक वार्ड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुरेश साबळे यांनी यावेळी दिले.

या बैठकीत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. आय.व्ही. शिंदे, डॉ. राम देशपांडे, डॉ. अजयकुमार राख, डॉ. आनंद कुलकर्णी, आयुष विशेष सेवा समितीचे अशासकीय सदस्य डॉ. पुरूषोत्तम पिंगळे, डॉ. संजय तांदळे, डॉ. महेंद्र गौशाल, डॉ. गणंजय देशपांडे, डॉ. अजित जाधव, डॉ. शेख मुबारक, डॉ.शेख निकहत, डॉ. सचिन रेवनवार, अॅड. श्रीराम लाखे, रत्नाकर कुलकर्णी, विनायक वझे, डॉ. सुदाम मोगले, डॉ. शिवप्रसाद चरखा, डॉ. विवेक कदम आदी सदस्य उपस्थित होते.
या बैठकीचे सुत्रसंचलन एसीपी आनंदकुमार निमकर तर उपस्थितांचे आभार डॉ. पुरूषोत्तम पिंगळे यांनी मानले.
