10 मुले पात्र, यशाची परंपरा कायम
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : माहे फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या व नुकत्याच जाहीर झालेल्या निकाला नुसार इयत्ता वर्ग पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. प्रा. शा. मॉडेल स्कूल सेमी इंग्लिश, मराठी अशोकनगर बीड ने एकूण 16 मुले परीक्षेत बसवली होती. पैकी 10 मुले अतिशय चांगली मार्क घेऊन पात्र झाली आहेत.

मागील वर्षी सुद्धा 5 मुले पात्र झाली होती. एकूणच यशाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे.पात्र मुलांचे अधिकारी, पदाधिकारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे. पात्र मुला मध्ये इटकर समर्थ, शेख इरफान, शेख साद बागवान मुआझ, सुरवसे जीविका, सय्यद नुमान, शेख मुझेफ, शेख रेहान, शेख मुजम्मिल, सय्यद दानिश ही मुले पात्र झाली आहेत. सर्व मुले गरीब व सामान्य वर्गातील असून यांना पुढील शिक्षणासाठी समाजातून आर्थिक सहायतेचि गरज आहे.
शाळेने या मुलासाठी खूप मेहनत घेतली आहे. शिक्षण समिती,पालक यांचे सहकार्य लाभले आहे.विस्तार अधिकारी माटे, केंद्र प्रमुख फेरोज पठाण मुख्याध्यापक शेख मुसा, औताने शुभांगी, अफसाना शेख, जायभाये विठ्ठल, मणियार हकीम, भोसले नितीन, काकडे मनीषा, शिंदे सखाराम यांनी विशेष लक्ष दिले. तर कदम शोभा, अनोळे संगीता, मठकरी, सोनवणे उषा, फुंदे भोंजीबा, मोराळे मनीषा, कागदे शिवकन्या, वाघमारे, चव्हाण सुरेखा, धस मॅडम यांनी साकार्य केले. परिसरातून सर्व मुलांना व शिक्षकांना शुभेच्छा मिळत असून अनेकांनी आपली मुले जिल्हा परिषद शाळेत शिकवण्याचे मुख्याध्यापक शेख मुसा यांच्याकडे बोलून दाखवले आहे.
