22 जण गंभीर जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
By MahaTimes ऑनलाइन |
सोलापूर : बार्शी तालुक्यातील (Barshi Fire) पांगरीमध्ये फटका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट (Pangri Fatke Factory Blast) झाला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार या घटनेत 7 कामगारांचा मृत्यू (Death) झाला तर 22 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.. परंतु प्रशासनाने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरुअसताना भीषण स्फोट झाला. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे

बार्शी तालुक्यात पांगरी शिराळा रस्त्यावर असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात आज चारच्या सुमारास फटाके बनवण्याचं काम सुरु असतांना ही घटना घडली. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते. तब्बल चार एकरात पसरलेल्या कारखान्यात या फटाका कारखान्यात बांगरवाडी, वालवाड, उकडगाव येथील ४० जण काम करीत होते. या स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर साधारण पाच लोक जखमी झाल्याचं सांगितलं जातंय.
वेळेत मदत न मिळाल्याने काहींचा तडफडून मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. मृत्यूच्या आकड्यांबाबत प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
मदतकार्यामध्ये सहभागी गावकऱ्याने सांगितलं की, स्फोट झाला त्यावेळी आम्ही मदतीसाठी धावून आलो. ऊसाच्या शेतात दोन महिलांचे मृतदेह उडून पडले होते. काही तडफडत पडले होते. आम्ही पोलिसांना आणि अॅम्ब्युलन्सला फोन केला. बार्शी, कुर्डूवाडी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, टेंभुर्णी आदी भागातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

