यश संपादन : सुजीत हजारे बनला डॉक्टर !
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिद्द चिकाटी व आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर अभ्यास करून येथील पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा सुजीत हजारेने आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडत एमबीबीएस ( MBBS ) परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

सुजीत हजारे यांनी लातूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेताना, अंतीम वर्षात दमदार यश मिळविले आहे. सुजीत हजारे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीड येथील संस्कार विद्यालय तर महाविद्यालयीन शिक्षण बलभीम कॉलेज येथे झाले आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेत तो बलभीम हाविद्यालयातून सर्वप्रथम आला होता.
नीट परिक्षेत उतुंग यश मिळविल्यानंतर, अहमदनगर येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रथम वर्षोला नंबर लागला होता, त्यानंतर शासकीय कोटयातून लातूर येथील शासकीय वैद्यकीय कॉलेजला नंबर लागला. एमबीबीएस सर्वच वर्षाच्या परिक्षेत तो कॉलेजमध्ये टॉपर राहिला आहे. डॉ. सुजीत हजारे यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

