या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले हजारो भाविक
By MahaTimes ऑनलाइन | बीड
मौजे रूद्रापुर येथे कळस पूजनाचा कार्यक्रम 2 मे रोजी सकाळी दहा वाजता थाटात संपन्न झाला. ह.भ.प. प्रेममुर्ती शिवाजी महाराज नारायणगडकर व ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज भगवानगडकर यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या या ऐतिहासिक क्षणाचे हजारो भाविक साक्षीदार ठरले.

सोमवारी दुपारी 12 ते 2 दरम्यान ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी ह.भ.प. प्रेममुर्ती शिवाजी महाराज नारायणगडकर व ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज भगवानगडकर यांच्या शुभहस्ते विधिवत कळस पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या अनुषंगाने गेली दोन दिवस महायज्ञ चे आयोजन करण्यात आले होते.

भव्य दिव्य शोभा यात्रा
ह.भ.प. शिवाजी महाराज व ह.भ.प. डॉ. नामदेश शास्त्री महाराज यांचे गावात आगमण होताच गावक-यांनी ढोल ताशा व लेझीमच्या तालात भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढून त्यांच उत्साहात स्वागत केले. महिलांनी ही डोक्यावर कळस घेऊन उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. सर्व पंचकोशीतील आलेल्या भाविक भक्तांनी सामिल होत शोभायात्रेची शान वाढविली. या सर्वांचे रुद्रापुर समस्त गावकरी मंडळीने आभार मानले.
गावात आठवडाभर भक्तीमय वातावरण
मौजे रूद्रापुर येथे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम, दो दिवशीय महायज्ञ आणि हनुमान मंदीराच्या कळस पूजनाचा कार्यक्रम यामुळे गेली आठवडाभर गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. गावातील सर्व जण आपले दैनिक कामकाज मागेपुढे करून पूर्णभक्तीभावाने धार्मिक कार्यक्रमात भाग घेउन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

