तातडीने कारवाई करण्याचे सभापती महोदयांच्या सूचना; बीड मतदार संघातील अनेक प्रलंबित विषय लागणार मार्गी
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : राज्याच्या बजेट संदर्भात विधानसभेमध्ये चालू असलेल्या अधिवेशनात आ संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदार जाणारा पाथर्डी- चिंचपूर- शिरूर कासार- रायमोह-राजुरी हा 44 किलोमीटरचा मार्ग एयुएल 1 (HAM AUHL1) 2019 साली मंजूर झाला असून याचे काम अत्यंत संत गतीने सुरू असून आतापर्यंत भारतासाठी काम करीत असलेल्या दोन्ही एजन्सीवर चौकशी चालू असून या संदर्भात पुढील काय कारवाई चालली आहे हे कळू शकत नाही. हा रस्ता लवकर पूर्ण झाला तर परिसरातील शेकडो गावांना याचा लाभ मिळणार असून यासंदर्भात संबंधित मंत्र्यासभेत बैठक घेणार का असे प्रश्न आ संदीप क्षीरसागर यांनी सभापती महोदयांना कडे उपस्थित केला. सभापती महोदयांनी सर्व मागण्यावर संबंधित विभागाच्या मंत्रालयाच्या दालनात लवकरच बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावा असा सूचना केल्या.

तसेच सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 हा रस्ता बीड शहरातून जिरेवाडी महालक्ष्मी चौक जालना रोड छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा- बार्शी रोड – बार्शी नाका ते कोल्हारवाडी बायपास पर्यंत जातो. सदरील रस्त्यावर प्रवेश करतांना व बाहेर निघतांना आजपर्यंत अनेक मोठे अपघात होवून जिवितहानी झालेली आहे. मी सातत्याने राष्ट्रीय महामार्ग व महाराष्ट्र शासनाकडे बीड शहरातून जाणारा बायपास टू बायपास रोडवरील प्रवेशद्वारे ते बाहेर निघणारे द्वारावर उड्डाणपुल करण्यासाठी सातत्याने पत्र व्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे. तसेच बीड शहराला बाहेरून 12 कि.मी.चा बायपास असून स्लिप सर्व्हिस रोड नसल्याने याबाबत देखील वारंवार बैठका घेतलेल्या आहे. या बाबतीत नागरिकांना मोठ्या प्रमणावर अडचणीचा सामना करावा लागत आहे. सदरील दोन्ही महत्त्वाचे प्रश्न माझ्या मतदार संघातील असल्या कारणाने या बाबतीत आपण काय उपाय योजना करणार? व ज्या उपाय योजना असतील त्या तात्काळ करण्यात याव्यात.
बीड शहरातील एमआयडीसी भागात मार्केट कमिटी असून रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चोऱ्या मारे होत असून येथे पोलीस स्टेशन देण्याची मागणी बीड शहराच्या व्यापारी बांधवांच्या माध्यमातून मी अनेक वेळा गृहमंत्र्यांकडे केली आहे यावर पण तातडीने उपाययोजना करावी. बीड शहरात मागील एक दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे काम झाल बीड शहरातील काकू-नाना हॉस्पिटल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी नाका या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून झालेले आहे. सदरील रस्त्याच्या दोन्ही बाजुने नाली बांधकाम करणे व पोल शिफ्टींग व महावितरणची तत्सम कामे करणे हे अत्यंत गरजेचे आहे.तसेच माझ्या मतदारसंघातील पाली सर्कलमध्ये सबस्टेशन मंजूर झाले असून गेल्या वर्षभरापासून तांत्रिक अडचणीमुळे सब स्टेशनचे काम सुरू होत नाही यामुळे नागरिक तर असेच झाले असून वीज आणि पाणी अभावी शेतकऱ्यांचे पिकाचे खूप मोठे नुकसान होत आहे. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन यावर तातडीने उपाययोजना करावी.
मागील काही वर्षापासून माझ्या मतदारसंघात मी मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन काही स्थानिक राजकीय पक्षाची मंडळी अधिकाऱ्यांना हाताशी धरून करीत आहे याबाबत ते हक्क भंग नोटीस दाखल केलेली होती तरी पण कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही सदरील मंडळी आता पण असे उपक्रम राबवित असून यावर तातडीने निर्णय घ्यावा. अशा मागण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभापतीच्या सभापतीच्या माध्यमातून संबंधित मंत्र्यांसमोर उपस्थित केले.

