स्वतः ट्विट करून दिली माहिती; कोरोनाची सौम्य लक्षणे
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. स्वतः पंकजा मुंडे यांनीही ट्विट (Tweet) करून माहिती दिली आहे.

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती चांगली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात पंकजा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन (Quarantine) आहेत. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी आधीच सावधगिरी बाळगत आयसोलेट झाले आहे.
दरम्यान त्या अनेक लोकांना भेटल्या. राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्यालाही हजेरी लावली. जे माझ्यासोबत होते त्यांनी कृपया आपापली चाचणी करून घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, अशा आशयाचे ट्विट पंकजा यांनी केले आहे. तेथून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Corona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 1, 2022
ताई, तब्येतीची काळजी घ्या
बहीण पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना मेसेज करुन काळजी घेण्याची सूचना केली आहे. ‘मी पंकजाताई ला फोन तर करू शकलो नाही मात्र मेसेजद्वारे सांगितले की, पोस्ट कोविड होण्याची दाट शक्यता असल्याचे तब्येतीची काळजी घेण्याची गरज सांगितले आहे. धनंजय मुंडे यांनी बीडकरांना आवाहन केले की, अद्याप कोरोना संपलेला नाही, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, मास्क व सेनिटायझरचा वापर करावा. जरुरी असेल तरच घराच्या बाहेर पडावे.
