पर्यावरण सुरक्षित तरच समाजाचे आरोग्य सुरक्षित – श्री सत्यसाई कार्तिक
By MahaTimes ऑनलाइन वृत्तसेवा | सोलापूर – इस्माईल पटेल
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात सहायक पोलीस अधीक्षक श्री. सत्यसाई कार्तिक (आयपीएस) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपंगे, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर सह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सोलापुर जिल्ह्याभरात पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी (ता.5 जून) रोजी विविध उपक्रमांनी पर्यावरण भान जपण्याचा संकल्प ठिकठिकाणी करण्यात आला. यात पोलीसबांधव ही मागे राहिले नाहीत. दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्यातील सोलापूर तालुका पोलीस ठाणे परिसरात शंभरच्या जवळपास झाडे लावुन जनतेच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी ही आम्ही सदैव तत्पर असल्याचे त्यांनी आपल्या कृतितून दाखवून दिले.

काल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सोलापूर तालुका पोलीस ठाणे परिसरात आयपीएस श्री. सत्यसाई कार्तिक यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दर्शनी भागात कांही झाडांची लागवड करण्यात आली. यानंतर ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी वृक्षारोपणात उत्साहात सहभाग नोंदविला. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी सर्वश्री. राठोड, जाधव, बागवान, बनसोडे, पवार, पोलीस नाईक माळी, सय्यद, आसिफ शेख, मुजगोंड, गायकवाड, मुल्ला, पाटील, पोलीस अंमलदार इंगळे, ननवरे , खावतोडे, चौधरी, नदाफ, गिरी आदिंनी योगदान दिले.
पर्यावरण सुरक्षित तरच समाजाचे आरोग्य सुरक्षित – सत्यसाई कार्तिक
पर्यावरण सुरक्षित तरच समाजाचे आरोग्य सुरक्षित. त्यामुळे पर्यावरण हेच सर्वस्व असून त्याची काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयपीएस श्री. सत्यसाई कार्तिक यांनी केले. सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. श्री. कार्तिक पुढे म्हणाले शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचा समतोल साधणे अत्यंत आवश्यक असून, ती काळाची गरज तर आहेच परंतु, सर्वांचे नैतिक कर्तव्यही आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रत्येक व्यक्ती ने किमान एक तरी झाड लावावे. यासह लावलेल्या रोपांचे योग्य रीतीने संगोपन करावे. जेणेकरून भविष्यात पर्यावरणातील चांगला बदल आपल्याला पहावयास मिळेल व पर्यावरणाचा र्हास थांबेल, असे आवाहन श्री कार्तिक यांनी केले.

