एकाने दीड लाख मागितले तर दुसऱ्याने प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेकडून दाखल अवर्षण माफीचा प्रस्ताव मंजूर करून 21 लाख रुपये माफी करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी मत्स्यव्यवसाय कार्यालय जालनाचे दोन बडे अधिकाऱ्याविरूध्द जालनाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्रवाई केली आहे.

या प्रकरणी आरोपी लोकसेवक 1) श्री.सुनील तुळशीराम वंजारी वय 55 वर्ष, धंदा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, चार्ज सहायकआयुक्त, वर्ग -2, मत्स्यव्यवसाय कार्यालय जालना, जि. जालना. 2) श्री शशिकांत जाधव वय 57 वर्षे, धंदा- सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (तांत्रिक) वर्ग 3 रा., जि.जालना यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार जालना जिल्ह्यातील डोलखेडा बु. मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाचे चेअरमन ( पुरूष वय 54 वर्ष) तथा तक्रारदार यांनी वर्ष 2019-2020 मध्ये सोमठाणा तलावाचा ठेका घेतला असून त्यांनी त्या सालीचा अवर्षण माफी चा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव मंजूर करून 21 लाख रुपये माफी करण्यासाठी आरोपी लोक सेवक क्र .1 यांनी 16 सप्टेंबर 2021 रोजी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती. सदरची लाच त्यांनी पंचा समक्ष केली व आलोसे क्र .2 यांनी लाच मागणीसाठी आलोसे क्र .1 यांना प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ला प्र वि औरंगाबाद चे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उप अधिक्षक एस.बी.पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जालना चे पोलीस निरीक्षक एस.एस.शेख यांनी काम पाहिले. या पथकात पोलीस अंमलदार मनोहर खंडागळे, गणेश चेके, ज्ञानेश्वर म्हस्के, जावेद शेख, गणेश बुजाडे, प्रविण खंदारे आदींचा समावेश होता. भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास संपर्क साधावे असे आवाहन ही लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी केले आहे.
