▪️प्रभाग क्र. १६ मधील निवडणूक मतदारांनीच हातात घेतली धुरा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड शहरातील प्रभाग क्रमांक १६ ची निवडणूक चांगलीच रंगात आली असून संपूर्ण शहराचे लक्ष या प्रभागाकडे लागले आहे. कारण या प्रभागाचे विकासपुरुष म्हणून ओळख असलेले फारुक पटेल आणि सर्वांचा विश्वास जपणाऱ्या नुज़हत आरा शहाबाज यांना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

प्रभागातील रस्ते, नाली, पाईपलाईन, विद्युत व्यवस्था, स्वच्छता अशा प्रत्येक कामात फारुक पटेल यांनी केलेली कामगिरी ठळकपणे दिसून येते. प्रभागाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतःच्या पुढाकाराने हजारो लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे हा त्यांचा मोठा उपक्रम ठरला.
सामाजिक आणि मानवी मूल्यांची जाण असलेले फारुक पटेल यांचे मोठे कार्य म्हणजे रुग्णांना मिळणारी तात्काळ मदत. रात्री अपरात्री कोणत्याही वेळी फोन आला तरी ते मदतीसाठी तत्पर असतात. कोविडच्या कठीण काळात जेव्हा अनेकजण रुग्णांना जवळ जात नव्हते, तेव्हा पटेल यांनी निःस्वार्थ भावनेने त्या रुग्णांची सेवा केली. त्यामुळे प्रभागातील तसेच शहरातील नागरिक आजही त्यांच्या त्या सेवाभावी कार्याची आठवण कृतज्ञतेने करतात.
प्रभागाचेच नव्हे तर संपूर्ण शहरातील विकास कामांवर देखील त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळेच प्रभाग १६ मधील मतदारांनी या निवडणुकीत फारुक पटेल यांना पुन्हा एकदा भक्कम पाठबळ देण्याचे निश्चित केले आहे.
त्यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या नुज़हत आरा शहाबाज — स्व. शाहबाज उर्फ शब्बो यांच्या पत्नी — यांनाही प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेख जमील भाई यांच्या कुटुंबाचा परंपरागत सामाजिक सहभाग आणि लोकांशी असलेला जवळचा संपर्क यामुळे नुज़हत आरा यांच्याबद्दलही मतदारांमध्ये चांगली स्वीकारार्हता दिसून येते.
प्रभाग क्र. १६ मधील निवडणूक मतदारांनीच आपल्या आवडीचे उमेदवार घोषित केल्याचे चित्र असून, या दोन्ही उमेदवारांना घवघवीत मतांनी विजयी करायचेच, असा निर्धार मतदारांमध्ये दिसून येत आहे.
