▪️भाजपाचाच नगराध्यक्ष होणार, नागरिकांकडून ‘ग्रीन सिग्नल’
▪️विकासाची महागंगा आता बीडमध्ये वळणार : नवनाथ शिराळे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड नगरपरिषद निवडणूक रंगात आली असून कोणत्या पक्षाचा झेंडा शहरावर फडकेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी घराघरात भेट देत शहरात भाजपाचे वातावरण निर्मिती केली असून त्यांच्या मोहिमेला मोठा जनसमर्थन मिळताना दिसत आहे.

निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीदरम्यानही शिराळे यांनी देवेंद्र फडणवीस (देवा भाऊ) राज्यात आणि नरेंद्र मोदी देशात करत असलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तर शिराळे यांनी शहरातील सर्व वार्डमध्ये जाऊन प्रचाराला वेग दिला असून “नगरपरिषद भाजपाच्याच ताब्यात आणायची” अशी हाक नागरिकांना दिली आहे.
शहरातील गल्लीबोळात सध्या ‘नवनाथ अण्णा’ चर्चेचा विषय ठरले आहेत. वार्ड क्रमांक 11, 12, 16, 17 व 18 मध्ये काढलेल्या प्रभातफेऱ्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपाच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
▪️विकासाची महागंगा आता बीडमध्ये वळणार : नवनाथ शिराळे
वार्ड क्रमांक 25 मध्ये आयोजित महासभेत शेकडो नागरिक उपस्थित होते. या सभेत बोलताना नवनाथ अण्णा शिराळे म्हणाले की,
“बीड नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवून एकहाती सत्ता आणायची आहे. राज्यात देवा भाऊंची आणि देशात मोदी साहेबांची सत्ता असल्याने विकासाची महागंगा आता बीडमध्ये वळणार आहे.” भाजपाच्या धोरणांमुळे शहराचा सर्वांगीण विकास होईल, महिला योजनांना गती मिळेल आणि ‘लखपती बहीण’ उपक्रमातून बहिणी स्वावलंबी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नगरपरिषदेत सभापतीपदाचा कार्यकाळ उल्लेखनीय राहिल्याने शिराळे यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.
शहरातील मतदारांमध्ये आता “बीड नगरपरिषदेत भाजपाचाच झेंडा फडकणार” अशी चर्चा रंगली असून भाजपाच्या विजयाला नागरिकांकडून ग्रीन सिग्नल मिळत असल्याचे चित्र आहे.
