Maha times ऑनलाइन
मुंबई : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देखील पेपरफुटीच्या विळख्यात सापडली आहे. उद्या (२८ जून) राज्यभर होणारी TET परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली असून, नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान काही संशयितांकडून प्रश्नपत्रिकेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर जप्त केलेल्या प्रश्नांपैकी अनेक प्रश्न मूळ TET प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
राज्यातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या तारखेची घोषणा तपास पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, NEET नंतर आता TET पेपरफुटीच्या घटनेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
The Maharashtra State Council of Examination (MSCE), Pune, has postponed the Maharashtra Teacher Eligibility Test (TET), which was scheduled to take place tomorrow, June 28, across the state. The decision follows an early-morning raid by the Bhiwandi Police, which exposed an alleged question paper leak racket.
