टाटा पॉवर सोलारचा ‘ToD’ तनिष्क गिफ्ट व्हाउचर विनर’ पुरस्कार; देशातील १३ कंपन्यांमध्ये मानाचे स्थान
By MahaTimes ऑनलाईन
बीड : बीडच्या हाफ सर्कल सोलर प्रा. लि. या कंपनीची टाटा पॉवर सोलारतर्फे आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘ToD ₹४ लाख तनिष्क गिफ्ट व्हाउचर विनर’ म्हणून राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण देशातून निवड झालेल्या केवळ १३ कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातून हाफ सर्कल सोलर प्रा. लि.ला स्थान मिळाल्याने बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हाफ सर्कल सोलर प्रा. लि. ही टाटा पॉवर सोलारची बीड जिल्ह्यातील अधिकृत चॅनेल पार्टनर कंपनी असून, गेल्या अनेक वर्षांपासून निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी व सेवा देत आहे. गुणवत्तापूर्ण काम, वेळेत प्रकल्प पूर्ण करणे, ग्राहक समाधान आणि उत्कृष्ट विक्री कामगिरीच्या जोरावर कंपनीला हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे.

टाटा पॉवर सोलारची वितरण व्यवस्था इतर अनेक सोलर कंपन्यांपेक्षा वेगळी मानली जाते. कंपनीचे सोलर साहित्य खुले बाजारात स्वतंत्रपणे विकले जात नसून, संपूर्ण सोलर किट केवळ अधिकृत चॅनेल पार्टनर्समार्फतच ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाते.
प्रत्येक प्रकल्पासाठी वॉरंटी सर्टिफिकेट तयार करणे बंधनकारक असल्याने उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत संपूर्ण प्रक्रियेची नोंद कंपनीकडे राहते. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण, अधिकृत वॉरंटी आणि विक्रीनंतरची सेवा अधिक प्रभावीपणे दिली जाते.
याउलट, इतर अनेक कंपन्यांचे साहित्य खुले बाजारात उपलब्ध असल्यामुळे विविध पुरवठादारांकडून साहित्य खरेदी करावे लागते. अशा वेळी संपूर्ण प्रकल्पावर एकसंध नियंत्रण आणि जबाबदारी निश्चित करणे तुलनेने अधिक अवघड ठरू शकते. टाटा पॉवर सोलारची नियंत्रित वितरण व्यवस्था ग्राहकांना प्रमाणित साहित्य, अधिकृत वॉरंटी आणि विश्वासार्ह सेवा मिळवून देण्यास मदत करते.
या राष्ट्रीय यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक आणि मित्रपरिवाराकडून हाफ सर्कल सोलर प्रा. लि.वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
🗣️ “हा सन्मान आमच्या ग्राहकांचा, सहकाऱ्यांचा आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीचा आहे. ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच आम्हाला राष्ट्रीय स्तरावर ही ओळख मिळाली. भविष्यातही सर्वोत्तम सेवा आणि दर्जेदार सौर ऊर्जा उपाय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”
-डी. बी. खान,
संचालक, हाफ सर्कल सोलर प्रा. लि.
