Skip to content
July 21, 2026
  • FaceBook
  • Instagram
  • Telegram
  • YouTube
MahaTimes

MahaTimes

  • Home
  • बीड जिल्हा
    • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • गेवराई
    • माजलगाव
    • पाटोदा
    • शिरूर
    • परळी
    • धारूर
    • केज
    • वडवणी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • स्पोर्ट्स
  • टिप्स & ट्रिक्स
  • ट्रेंडिंग
  • आरोग्य व शिक्षण
  • अपराध जगत
  • फिल्मी जगत
Watch Online
  • Home
  • महाराष्ट्र
  • मोठा दिलासा : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे
  • महाराष्ट्र
  • महावितरण

मोठा दिलासा : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे

MahaTimes January 4, 2023 1 min read

ऊर्जामंत्री फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

By MahaTimes ऑनलाइन | मुंबई/बीड : महावितरणच्या खासगीकरणा विरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि 31 संघटनांशी तीन ते चार मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

मोठा दिलासा : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे - mahatimes.in

या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. संप मागे घेतल्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला असून वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, तीन्ही विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बैठक झाली. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि 31 संघटनांशी तीन ते चार मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. पुढच्या तासाभरामध्ये वीज पुरवठा सुरळीत होईल असे, वीज संघटनांनी सांगितले आहे.

या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, राज्य सरकारला तीन्ही वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचे नाही. येत्या तीन वर्षात राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक व्यवस्था उभी करण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी हा संप पुकारला होता, असे वीज कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले. आज सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारने घेतलेल्या निर्णयाने, आश्वासनामुळे आमचे समाधान झाले असल्याचे वीज कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

अदानी समूहाने समांतर परवान्यासाठी अर्ज केला. त्याच्या निषेधार्थ हा संप करण्यात आला होता. याबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, समांतर परवान्याबाबत महावितरण, सरकारने अर्ज वीज नियामक आयोगाकडे करायला हवे अशी भूमिका वीज कर्मचारी संघटनांनी मांडली होती. राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचे निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.

https://t.me/mahatimes
Tags: 2023 beed breaking news INDIA maha times MAHARASHTRA mahatimes MAHATIMES.IN mahavitaran app mahavitaran electricity bill mahavitaran logo MAHAVITRAN Strike StrikePrivatizationMahavitaranAdani बीड

Continue Reading

Previous: Electricity workers strike : आज मध्यरात्रीपासून वीज कर्मचारी संपावर
Next: मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न करणार -देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Stories

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर: आदर्श आचार संहिता लागू
1 min read
  • निवडणूक
  • महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर: आदर्श आचार संहिता लागू

March 16, 2024
पंकजा मुंडें, नितीन गडकरीसह 20 जणांची नावं जाहीर
1 min read
  • बीड
  • महाराष्ट्र

पंकजा मुंडें, नितीन गडकरीसह 20 जणांची नावं जाहीर

March 13, 2024
शेख शोएब जिल्हा वक्फ अधिकारी परीक्षेत राज्यात पंधरावा
1 min read
  • बीड
  • महाराष्ट्र

शेख शोएब जिल्हा वक्फ अधिकारी परीक्षेत राज्यात पंधरावा

February 18, 2024

Contact us : Web Development & Digital Markting Service - Beed, MH - IND

  • Call : +917709070755
  • website: https://thewebtags.com

Recent Posts

  • शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गौण खनिज मोफत मिळणार
  • ‘NEET’ नंतर ‘TET’चाही पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द!
  • कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महिला पर्यवेक्षिकेचा जागीच मृत्य
  • ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक अन् दुचाकीने घेतला पेट; दोघांचा होरपळून मृत्यू!
  • “DeepEye” एआय प्रकल्पामुळे बीड पोलिसांच्या तपासाला डिजिटल गती!

Advertisements Space 1

Advertisements Space 2

You may have missed

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गौण खनिज मोफत मिळणार
1 min read
  • Uncategorized

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गौण खनिज मोफत मिळणार

July 3, 2026
‘NEET’ नंतर ‘TET’चाही पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द!
1 min read
  • Maharashtra

‘NEET’ नंतर ‘TET’चाही पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द!

June 27, 2026
कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महिला पर्यवेक्षिकेचा जागीच मृत्य
1 min read
  • मराठवाड़ा

कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महिला पर्यवेक्षिकेचा जागीच मृत्य

May 23, 2026
ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक अन् दुचाकीने घेतला पेट; दोघांचा होरपळून मृत्यू!
1 min read
  • India
  • अपघात
  • बीड जिल्हा

ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक अन् दुचाकीने घेतला पेट; दोघांचा होरपळून मृत्यू!

May 20, 2026

अ‍ॅडमिन: रईस खान
कार्यालय : छत्रपती शिवाजी महाराज चौक,
बार्शी रोड, बीड, महाराष्ट्र.
संपर्क: +919767421030

Advertise

जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क करा

संपर्क: +919767421030
ईमेल : raiskhan.mahatimes@gmail.com

Contact Now

Call Now: +917709070755

  • FaceBook
  • Instagram
  • Telegram
  • YouTube
| MahaTimes | Copyright © All Rights Reserved | Design & Manage By TheWebTags